जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २५ वर्षीय भुषण बोरोले संभाजीनगरात मोटरसायकलच्या अपघातात उजव्या पायास गुडघ्याखाली फॅक्चर झाले. अत्यावस्थ अवस्थेतच त्याला जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात आणले. येथील तज्ञांनी ट्रोमा मॅनेजमेंट करत त्याच्या पायावर टीबीया शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.रावेर ता निंभोरा गावातील हया तरूणास संभाजीनगरात रूग्णालयातच सॅच्युरेशनचा त्रास होवून श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला सर्जीकल अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आले. ७ दिवस त्याच्यावर फिजिशियन व अस्थीरोग तज्ञांच्या मदतीने उपचार करून नुकतीच त्यांच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चर रॉड टाकून जोडण्यात आले.
अस्थीरोग तज्ञ डॉ. दिपक अग्रवाल यांनी ही शस्त्रक्रिया केली त्यांना डॉ. प्रसाद बांबरसे, डॉ.चाणक्य,डॉ अंकीत भालेराव आणि डॉ गौतम कुंभार यांनी सहकार्य केले.
रूग्ण आला त्यावैळी श्वासोश्वासाचा त्रास होता. अनेक वेळा अपघातात तुटलेल्या शरीरातील चरबीचे तुकडे रक्तवाहीन्यांमध्ये जावून अशी परिस्थीती उदभवते. रक्तचाचण्यामध्ये डी डायमर वाढले होते. फॅट एम्बोलिजम हा अत्यंत गंभीर आजार असून त्या करीता रूग्णावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असते. यासाठी रूग्ण लवकर शस्त्रक्रियेसाठी फिट व्हावा लागतो. रूग्णांचा टु डी इको देखील करण्यात आला. एक्सरे मधून फॅक्चरचे निदान झाले होते व लवकरच रूग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
अत्यावस्थ रूग्णाच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चरवर यशस्वी उपचार
11 months ago
No Comments