‘त्या’ दोन्ही अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित दोन अल्पवयीन मुलांना शहर पोलिसांनी एसएमआयटी कॉलेज परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहे. ताब्यात असलेल्या दोन्ही संशयित अल्पवयीन चोरट्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी १६ जुलै रोजी दुपारी बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरासह इतर बाजारपेठ परिसरातून बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकींची चोरी झाल्याचे प्रकार वाढत आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी शुक्रवार १४ जुलै रोजी मध्यरात्री एसएम आयटी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून बचोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या होत्या. ताब्यात असलेल्या संशयितांना न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

Protected Content