जलसंधारणाचा संदेश देत अडावदमध्ये विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी !


अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसभागीय सूक्ष्म नियोजनासाठी आज (गुरुवार, १९ जून) भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता ग्रामपंचायतीपासून सुरू झालेल्या या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ अशा घोषणा देत प्रत्येक गल्लीबोळात जनजागृती केली.

पोकरा योजनेची माहिती देण्यासाठी चार टप्पे
या प्रभात फेरीचा मुख्य उद्देश गावातील सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये पोकरा योजनेबाबत जनजागृती करणे हा होता. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लोकसभागीय सूक्ष्म नियोजनासाठी एकूण चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत: मशाल फेरी, प्रभात फेरी, महिला ग्रामसभा आणि सर्वसाधारण विशेष ग्रामसभा. या टप्प्यांमधून शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून मिळणाऱ्या लाभांची सविस्तर माहिती दिली जाईल. जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचावा यासाठी प्रभात फेरी ग्रामपंचायतीपासून सुरू होऊन महाराणाप्रताप रोड, शंभूभवानी चौक, पंचवृक्ष चौक, नेहरू चौक, महर्षी वाल्मीक चौक, दुर्गादेवी चौक, सुभाष चौक, श्रीराम चौक, महात्मा फुले रोड, चांग्यानिम चौक मार्गे परत ग्रामपंचायतीपर्यंत काढण्यात आली.

विद्यार्थी आणि मान्यवरांचा सक्रिय सहभाग
या प्रभात फेरीत शामराव येसो महाजन विद्यालय आणि सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. तसेच, ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी, सहायक कृषी अधिकारी किशोर महाजन, सहायक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी सेवक किरण गोसावी, प्रवीण सोनार, सदस्य सचिन महाजन, रवींद्र चव्हाण, संदीप महाजन, विकासो चेअरमन भूषण देशमुख, संजय देशमुख, साहेबराव धनगर, पी. डी. मगरे, वसंत धनगर, साहेबराव धनगर, चंद्रकांत महाजन, शा.ये. महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक पी. आर. माळी, सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. जे. कदम, उपशिक्षक व्ही. एच. पानमन आणि एच. आर. कणखरे यांचा सक्रिय सहभाग होता.