यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दगडी व मनवेल येथील शेतमजूर महिलांना रोजंदारीत वाढ मिळावी यासाठी गेल्या चार दिवसांपासून कामावर बहिष्कार केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरपंच सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
वाढती महागाई मुळे शंभर रुपये मजुरी महिलांना परवडत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासुन दगडी व मनवेल येथील महिला कामावर बहिष्कार टाकुन घरीच आहे तर मनवेल ग्रामपंचायत कार्यलयावर धडक मोर्चा काढुन सरपंच जयसिंग सोनवणे यांना निवेदन देऊन समस्यां सोडविण्याची मागणी केली होती. सरपंच जयसिंग सोनवणे यांनी गावातील महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी बसस्थानक जवळील महर्षि वाल्मिक बसस्थानक जवळ शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता हजर राहुन समस्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता मजुरांच्या या प्रश्नाकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे या प्रश्ना तोडगा निघाला नसल्याचे सरपंच जयसिंग सोनवणे यांनी सागीतले. दगडी व मनवेल या परिसरातील शेकडो शेतमजुर महीला मागील चार दिवसापासुन मजूर घरीच : दगडी या आदीवासी गावातील मजुरीच्या दरात वाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केल्याने चार दिवसापासुन बेरोजगार झाल्या आहेत.
स्थानिक शेतमजुर महिलांनी काम बंद केल्याने साकळी येथील मजुरांकडुन शेतकरी आपली कामे करून घेत असल्याचे दिसुन येत आहे. दगडी व मनवेल येथील मजुरी महिलांनी रोजंदारीत वाढ करण्यासाठी चार दिवसापासुन महिला घरीच आहे तर साकळी येथील महिला गावात कामावर येत असल्यामुळे मजुरीत वाढ करण्याचा तोडगा निघाला नाही. संध्याकाळी पाच वाजता ४० ते ४५ महिला जमा झाल्या मात्र महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्यामुळे महिलांच्या हिरमोड झाला. रविवार पासुन कामावर टाकण्यात आलेला बहिष्कार कायम असुन बुधवारी सुध्दा काम बंद आंदोलन करुन रोजंदारीत वाढ करण्यासाठी महिलांच्या संप कायम राहणार असल्याचे निर्धार परिसरातील शेतमजुर महिलांनी केला आहे.