जागतिक फार्मासिस्ट दिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

leva bhawan

जळगाव, प्रतिनिधी | जगभरात साजरा होणा-या जागतिक फर्मासिस्ट दिवसानिमीत्ताने बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे सकाळी ११ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीसह विविधांगी कार्यक्रमांचे भरीव आयोजन लेवा भवन परिसरात करण्यात आले होते. गेल्या १० वर्षापासून जळगाव शहरातील सर्व फार्मसी कॉलेज व जिल्हा केमिस्ट संघटना हा जागतीक फार्मसी दिवसमोठया उत्साहाने साजरा करीत आहेत. खांदेश बीग बाजार येथून भव्य रॅलाचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचा मानपत्र देवून सत्कार  जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षापासून सर्व
फार्मासिस्ट कॉलेजच विद्यार्थी, एम. आर. यांचे सोबत जागतीक फार्मासिस्ट  दिवस यशस्वीपणे व विविध  सामाजीक उपक्रमांना साजरा केला जात आहे. यावेळी सर्व
फार्मासिस्ट कॉलेजच्या वतीने देवकर कॉलेजचे प्राचार्य नितीन पाटील व सर्व उपस्थीत प्राचार्य, कर्मचारी यांच्या हस्ते सुनील भंगाळे यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

फार्मासिस्ट रॅलीने चित्त वेधले

खानदेश  बीग बाजार येथून जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व देवकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य याच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. याप्रसंगी सचिव अनिल झवर, देवकर कॉलेजचे प्राचार्य नितीन पाटील, संत मुक्ताई फार्मसी कॉलेजचे प्राचार्य संजय लढे, ममुराबाद फार्मसी कॉलेजचे प्राचार्य जोशी व देशमुख, पी.ई.तात्या पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अनुप कुळकर्णी, शासकीय कॉलेजचे प्राचार्य आर. जे. दास, त्रिमुर्ती कॉलेजचे प्रा. बाहेती, प्रांजल
घोलप, इतर मान्यवर रॅली नेहरु चौक – टॉवर चौक – चित्रा टॉकीज चौक – शिवाजी पुतळा – बस स्टैंड – मार्ग काढण्यात आली होती. तिचा समारोप पुन्हा सरदार लेवा भवन येथे करण्यात आला. रॅलीद्वारे आरोग्यरक्षण व बेटी बचावचा संदेश देण्यात आला. या भव्य रॅलीत सर्व फार्मसी कॉलेज व जिल्हा केमिस्ट संघटनेचे असे जवळपास १२०० ते १५०० फार्मासिस्ट व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.जिल्हा संघटनेचे सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, देवकर कॉलेजचे प्राचार्य नितीन पाटील, संत मुक्ताई फार्मसी कॉलेजचे प्राचार्य संजय लढे , ममुराबाद फार्मसी कॉलेजचे प्राचार्य जोशी व देशमुख, पी.ई.तात्या पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अनुप कुळकर्णी, शासकीय कॉलेजचे प्राचार्य आर.जे.दास , त्रिमुर्ती कॉलेजचे प्रा.बाहेती , प्रांजल घोलप, इतर मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.  जागतीक फार्मासिस्ट दिवसाच्या निमीत्ताने फार्मासिस्टची शपथ डॉ.चैताली पवार यांनी दिली. शासकिय तंत्र निकेतन कॉलेजचे प्राचार्य आर.जे.दास यांनी मार्गदर्शनकेले.

जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे आयोजीत रॅली, रक्तदान शिबीर, हिमाग्लोबीन तपासणी, नेत्र तपासणी या कार्यक्रमातून फार्मासिस्टची प्रतिमा समाजमनात उंचावणार असण्याची ग्वाही सुनील भंगाळे यांनी दिली. सर्व केमिस्ट बांधवांना, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आभार जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष ब्रजेश जैन यांनी तर सूत्रसंचालन अयाज मोहसिन यांनी केले.

विविध शिबीरांना उस्फूर्त प्रतिसाद

जागतिक फर्मासिस्ट दिवसाच्या निमीत्त जळगाव शहरात व जिल्हयात जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे आयोजीत विविध फार्मसी कॉलेजच्या उस्फूर्त सहभागाने पार पडलेल्या फार्मासिस्ट कार्यशाळा, रक्तदान शिबीर, शाळामध्ये आयोजीत विद्यार्थ्यांच्या हिमाग्लोबीन तपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. गोळवलकर रक्तपेढीचा सहकार्याने रक्तदान शिबीरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी  रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हासंघटनेचे पदाधिकारी  अनिल झंवर, शामकांत वाणी, ब्रजेश जैन, रुपेश चौधरी, अमित चांदिवाल, राजेंद्र पाटील, दिनेश मालु, ईरफान सालार, संजय तिवारी धनंजय तळेले, अनिल कोळंबे, राजीव चौधरी, सुनील पाटील, मनीष अत्तरदे, खालीद सैयद, जयेश महाजन, दिपक चौधरी, पंकज पाटील, रविंद्र वराडे, किशोर बारी, प्रकाश चव्हाण, विलास बरडे, साहेबराव भोई, भानुदास नाईक, पद्माकर  पाटील, रवि रडे, प्रवीण कोठावदे, दिनेश चौधरी, शिरीषं बडगुजर, सुरेश पाटील, इलियास शेख, परवेजभाई तसेच जिल्हा कार्यकारीणीचे व तालुका कार्यकारिणीचे सदस्य व इतर केमिस्ट  बांधव यांनी कामकाज पहिले.

Protected Content