ममता बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन सुरूच

कोलकाता वृत्तसंस्था । सीबीआय आणि पोलीस यांच्या संघर्षात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी उडी घेत सुरू केलेले आंदोलन आज सकाळीदेखील सुरूच असून आज हे प्रकरण चिघळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

शारदा आणि राजवैली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी विचारपूस करण्यासाठी सीबीआयची एक टीम रविवारी संध्याकाळी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचली. मात्र अन्य पोलीस अधिकार्‍यांनी सीबीआय टीमला रोखून सीबीआयच्या पाच अधिकार्‍यांना अटक केली, त्यानंतर दोन-तीन तासांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणी केंद्र सरकार दबावतंत्राचा वापर करण्याचा आरोप करून ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, देशभरातील बहुतांश विरोधी पक्षांनी ममतांना पाठींबा दिला असून आज अनेक नेते त्यांच्या समर्थनार्थ कोलकाता येथे पोहचणार असल्याचे वृत्त आहे.

Add Comment

Protected Content