जळगाव प्रतिनिधी । शहरात कडक निर्बंध असतांनाही गाण्याचे चित्रीकरण करणार्या तरुणीसह दहा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी एक लाखांचा कॅमेरा, व दहा दुचाकी असा एकूण ४ लाख २५ हजारांचा माल जप्त केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील मेहरुण तलाव परिसरात काही तरुण एकत्र जमून चित्रीकरण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी मिळाली. त्यानुसार चिंथा यांनी एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सुचना केल्या. याठिकाणी चित्रीकरण करणार्या वृशाल नितीन राठोड (वय २० रा. सुप्रिम कॉलनी), मनोज भिका जाधव (वय २० रा.धोबीवराड ता.जि.जळगाव), सूरज रंजे सोनार (वय १९ रा. रामेश्वर कॉलनी), अभिजित रमेश चव्हाण (वय २५ रा. सुप्रिम कॉलनी), आनंद उर्फ गणेश सोमनाथ भोई (वय २१ रा. जुने गाव मेहुणबारे ता.जळगाव), सचिन चंद्रकांत भिरुड (वय २३ रा. पिंप्राळा जळगाव), गोपाल जगदीश राठोड (वय १९), ईश्वर रोहिदास राठोड (वय २२, दोन्ही रा. धोबीवराड ता.जळगाव), रीना यशवंत जाधव (वय २०, रा. शिवकॉलनी), अंकिता शरद बोदडे (वय २० रा. जामनेर) यांना ताब्यात घेत कारवाई केली. कारवाईत एक लाखांचा कॅमेरा तसेच दहा दुचाकी असा ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरुन कडक निर्बंध असतांनाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून तरुणीसह तरुण अशा दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, यांच्यासह पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील अशोक फुसे, निर्भया पथकातील मंजुळा तिवारी, सुनीला कुरे, किरण अवचार, वैशाली बाविस्कर, वर्षा डोंगरदिवे, कविता बारवाल, जितेंद्र पाटील, सुनील नाईक, मंगेश पाटील, आरसीपी पथकातील राहूल पाटील, आवेश शेख, प्रवीण लोहार, विशाल तायडे या कर्मचार्यांच्या पथकाने ही कारवाई केली.