अत्याचारी नराधमास कठोर शिक्षा करा – महिला संघटनेची मागणी (व्हिडीओ)

chalisagaon 3

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील तळवाडे पेठ येथील दिव्यांग भगिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ प्रेरणा दिव्यांग विकास बहुउद्देशिय संस्था, हिरकणी महिला मंडळ व राष्ट्रमाता जिजाऊ समिती आणि अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला. अत्याचारी नराधमास कठोर शिक्षा व्हावी, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूकबधिर असलेल्या महिलेच्या मूकबधिरपणाचा फायदा घेत गावातील शिवाजी निंबा जाधव या नराधमाने अत्याचार केला असून सदर पिडीत महिला या अत्याचारातून गर्भवती झाली आहे. ही घटना समाजमनाला काळीमा फासणारी आहे. झालेल्या अत्याचाराची घटना संतापजनक व चीड आणणारी आहे. त्यामुळे नराधमास मदत तात्काळ अटक करुन हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, पीडित मुलीच्या कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, मुलीला सर्व वैद्यकीय मदत मिळावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी स्वयंदिप फाउंडेशनच्या अध्यक्षा मिनाक्षी निकम, हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्रा पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ समितीच्या सोनल साळुंखे, डॉ. उज्वला देवरे, नगरसेविका सविता राजपूत, माजी नगरसेविका स्मिता पाटील, प्रतिभा पाटील, सरोज जाधव, योगिता राजपूत यासोबतच दिव्यांग महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. तसेच यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, प्रा. साहेबराव घोडे, सी.आर.कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे आदींनी भेट देत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Protected Content