मुक्ताईनगरात कडकडीत बंद : केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

मुक्ताईनगर प्रतिनिधी | उत्तरप्रदेशातील घटनेच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या बंदला शहरासह परिसरातून उत्तम प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. तिन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.

याबाबत वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्‍यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला मुक्ताईनगर शहरवासीयांनी पूर्णपणे कडकडीत बंद करून प्रतिसाद दिला. व्यापारी वर्गाने आज आपआपली दुकाने बंद  केली.

दरम्यान, लखीमपूरची घटना जलियानवाला बाग हत्याकांडासारखी आहे.असे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एस. इ. भोई यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर मध्ये शेतकर्‍यांची हत्या घडवून आणणार्‍या पक्षाला बंदद्वारे चोख उत्तर दिले असून लखीमपूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजपकडून मारेकर्‍यांचा बचाव करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे. याचा निषेध म्हणून कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी परिवर्तन चौकामध्ये केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. शहरामध्ये बंद मध्ये मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दिली.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष एस ए भोई सर, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,तालुका उपाध्यक्ष अँड.राहुल पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू माळी, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे ,माजी तालुकाध्यक्ष अँड.अरविंद गोसावी, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी गवई, अ.जा.तालुकाध्यक्ष निलेश भालेराव ,प्रा.सुभास पाटील,नामदेव भोई,तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव,निखिल चौधरी,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष बापू ससाणे,संजय कोळी,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सोपान दुट्टे,राजू वानखेडे, यासिन खान, रवींद्र महाजन, शहर उपाध्यक्ष आरिफ रब्बानी,शिवाजी पाटील, संजय धामोळे,अनिल सोनवणे, रवी जयकर ,वसीम मन्सुरी, आनंदा कोळी,पवन कांडेलकर,आदी महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content