भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका अध्यक्षपदी साक्षी पाटील

यावल प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने नुकतीच यावल तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून साक्षी पाटील यांची यावल तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

साक्षी गेल्या एक वर्षापासून संघटनेमध्ये तालुका समन्वयक या पदावर कार्य करत होत्या. गेल्या एक वर्षात उत्तम, प्रामाणिक, गौरवास्पद नेतृत्व, हसतमुख सर्वांना सांभाळून घेत त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. या अनुषंगाने त्यांना गेल्यावर्षी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे तीन ऑक्टोंबर रोजी कोविड योद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला. तथा सात जून रोजी केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यांच्यातर्फे खानदेशची रणरागिनी हा पुरस्कार प्राप्त झाला आणि नुकताच राज्यस्तरीय नारीदीप पुरस्कार झाला जाहीर झाला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी शांत व शिस्तप्रिय कमी वयात नावलौकिक करणारी ही सामान्य कुटुंबातील असामान्य कन्या याच वागणुकीमुळे खानदेशात प्रथमच तालुका एक युवती चालवणार आहे. अध्यक्ष या पदावर साक्षीची निवड प्रदेश अध्यक्ष तेजस पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर, राज्य अध्यक्ष प्रशांत गुरव, राज्य उपाध्यक्ष राहुल वाकलकर यांच्या शिफारशीवरून करण्यात आली. तालुक्यातील युवक तथा युवतींना राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत काम करण्याची संधी मिळाली असून या संधीचे अमूल्य सोने करून असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष साक्षी पाटील ह्यांनी सांगितले.

Protected Content