धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कजगाव रेल्वे स्थानकानजीक धावत्या रेल्वेतून एक अनोळखी व्यक्ती पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे.

सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे खंबा कि.मी.क्रं.347/4A अपट्रॅकवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि.५ मे रोजी घडली आहे. मृत अनोळखी इसमाचा अंदाजे वय – ४५ वर्ष असुन मयताची उंची ५ फुट ५ इंच, गौरवर्ण, शरीर बांधा मजबुत, डोक्याचे केस काळे, दाढीचे केस बारिक, उजव्या हातावर AK माँ असे गोंधलेले तसेच अंगावर आकाशी निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे.

सदर मयताविषयी कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९८९०६३३४३५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे ए.एस.आय.सुभाष बोरसे हे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!