रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला असून तापी काठच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. यात ७०० हेक्टर जमिनीवरील केळी भुईसपाट झाली आहे.
नैसर्गिक संकटाने केळी पूर्ण भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. रावेर तालुक्यात दुपारी साडे चारच्या दरम्यान वादळाला सुरुवात झाली. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहे. अनेक ठिकाणी महावितरणच्या तारांवर झाड पडल्याने अनेक गावांची विज गायब झाली होती. या आलेल्या वादळाचा सर्वाधिक फटका केळी पिकांना बसला असुन अनेक गावांतील घरांवरील पत्रे देखिल उडाल्याचे वृत्त आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालदील झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हरलाल कोळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.