वाकडीत दोन गटात तुफान हाणामारी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील वाकडी गावात आगीमुळे निंबूच्या झाडाला आच लागल्याच्या कारणावरून दोन गटात कोयत्याने मारहाण झाल्याची थरारक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “तालुक्यातील वाकडी येथील मछिंद्र उत्तम सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, दि. ७ जून रोजी ते शेतात गेले असतांना त्यांनी सामायिक बांधावरील कचरा जाळण्यासाठी आग पेटवली. तेव्हा बांधावरील निंबूच्या झाडाला आच लागली. याचाच राग आल्याने गोविंदा रवींद्र पाटील यांनी शिवीगाळ करत हातातील कोयत्याने मछिंद्र उत्तम सोनावणे यांच्या डाव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत केली. त्यानंतर गोविंदा रवींद्र पाटील व रवींद्र महादू पाटील दोघेही रा. मुदखेड ता. चाळीसगाव यांनी चापटबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सोनावणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यावर तात्काळ त्यांना चाळीसगाव शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारकामी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान मछिंद्र उत्तम सोनावणे यांच्या जाबजबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे सुरेखा धनंजय देवरे (वय २८) रा. मुंदखेडा ता. चाळीसगाव यांनी आपल्या फिर्यादीत, आरोपितांनी सामायिक बांधावरील आमच्या निंबुच्या झाडाला पेटविल्याच्या कारणावरून बबलू उत्तम धनगर, शिवा उत्तम धनगर, नितीन नाना धनगर व दिलीप रामराव पाटील सर्व रा. वाकडी आदींनी हातातील कोयत्याने माझ्यासह पतीला मारहाण केली.

शिवा उत्तम धनगर, नितीन नाना धनगर यांनी हातातील काठीने साक्षीदार यांच्या पोटावर, पाठीवर व छातीवर जबर मारहाण केली. व दिलीप रामराव पाटील यांनी फिर्यादी व साक्षीदार यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून सुरेखा देवरे यांच्या फियादीवरून ग्रामीण पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना मनोज पाटील हे करीत आहे.

Protected Content