जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व विविध सामाजिक संस्थाच्या वतीने रेशन दुकानदारांची चालवलेली मनमानी कारभार व भ्रष्टाचारावर आळा घालण्याबाबत महसूलचे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना बुधवार १० नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात गरजू व गरीबांना मदतीचा असा एक मुद्दा अन्न आहे. शासनाच्या वतीने नियोजन करून स्वस्त धान्य दुकानारांना पोहोच करते. परंतू स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मनमानी कारभार करून नागरीकांशी असभ्यतेची भाषा वापरतात. धान्याच्या वजनात देखील फरक केली जाते. धान्याची पोहोच पावती देण्यात येत नाही. दुकानदार वेळेवर दुकान उघडत नाही, त्याप्रमाणे शासनाच्या योजनेत असलेल्या बारा आकडी नंबरमध्ये भ्रष्टाचार केला जातो. यासह अन्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन बुधवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना देण्यात आले. याची चौकशी करून संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र भावसार, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सुरज दायमा, सर्वज्ञ बहुद्देशीय संस्थाचे सुचित्रा महाजन, मी मराठी प्रतिष्ठानचे राहुल परकाळे, रेल्वे माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर सैदाणे, आई बाबा सेवा संस्थेचे शैलेश ठाकूर, खानदेश युथ फाऊंडेशनचे रोहन महाजन, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.