खांबासह विद्युत तारांची चोरी; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मुगल गार्डनजवळील असलेले वीज खांबासह विद्युत तारा लांबविल्याची घटना दि. १९ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील शिवाजी नगरातील मुगल गार्डनजवळील रोडवर महावितरण कंपनीच्या मालकीचे वीज खांब व ऍल्युमिनियमच्या विद्युत तारा पडलेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी याठिकाणाहून ४८ हजार रुपये किंमतीच्या ताराव व खांब चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी दुपपारच्या सुमारास उघडकीस आली. सोमवारी महावितरणचे सहाय्यक अभियंता हर्षल इंगळे यांनी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना योगेश पाटील हे करीत आहे.

Protected Content