गोदावरी आयएमआरवर अज्ञात माथेफिरूची दगडफेक : कारचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी आयएमआर महाविद्यालयावर काल रात्रीच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने दगडफेक करून झायलो कारचे नुकसान करण्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, काल रात्री सुमारे 12.45 वाजेच्या सुमारास गोदावरी आयएमआर महाविद्यालयावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यात महाविद्यालयाच्या एमएच 19 बीयू 7005 क्रमांकाच्या वाहनाच्या काचेची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे कर्मचारी मयूर हेमराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात माथेफिरूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Protected Content