गाडीचा कट लागल्यावरून दोन गटात तुफान दगडफेक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद होवून तुफान दगडफेक झाली. ही घटना शाहूनगरातील खान्देशमिल कॉलनीत घडली. यामध्ये दोन ते तीन जण जखमी झाले असून कॉलनीतील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील सुमारे बारा जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शाहूनगराजवळील खान्देशमील कॉलनीतील राहुल राधेश्याम झंवर (वय-४३) हे वकील आहेत. शुक्रवार ३ मे रोजी रात्री ते (एमएच १९, डीटी २८८८) क्रमांकाच्या कारने घरी आले. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांना दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याचे दिसले. झंवर यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न के ला, मात्र त्यांनी झंवर यांना ढकलून देत ते एकमेकांसोबत झटापट करु लागले. त्यांच्यातील वाद हा वाढतच असल्याने त्या दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरु वात के ली. यामध्ये दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले. तसेच दगडफेकीत कॉलनती राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

झंवर यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी दगडफेक करणाऱ्यांपैकी भूषण राजेंद्र साबळे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी), शोएब शरीफ भिस्ती (वय-२१, रा. नुरानी मशिद समोर शाहूनगर), सैय्यद आसीफ सैय्यद अजीज (वय २६, रा. नुरानी मशिदजवळ शाहूनगर) व सोमनाथ महादू पाटील उर्फ शेंड्या (वय -२१, रा. शाहूनगर) यांना अटक करण्यात आली होती.

दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील भूषण राजेंद्र साबळे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी), शोएब शरीफ भिस्ती (वय २१, रा. नुरानी मशिद समोर शाहूनगर), सैय्यद आसीफ सैय्यद अजीज (वय २६, रा. नुरानी मशिदजवळ शाहूनगर) व सोमनाथ महादू पाटील उर्फ शेंड्या (वय २१, रा. शाहूनगर), तौसिफ उर्फ धम्मस (वय ३२, रा. शाहूनगर), एक अल्पवयीन मुलासह बारा जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content