अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बाबा नगर परिसरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाळीसगाव शहरातील राणी पार्कजवळून एकाने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना १ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी दुपारी अडीच वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील बाबा नगर परिसरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १ मे रोजी सकाळी ११.३० वाजता चाळीसगाव शहरातील राणी पार्क परिसरात मुलगी कामाच्या निमित्ताने आलेल्या असतांना मयुर चंद्रकांत झोडगे रा. आदित्य नगर, चाळीसगाव याने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. अशी तक्रार पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीसात दिली आहे. त्यानुसार शनिवारी ४ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मयुर चंद्रकांत झोडगे रा. आदित्य नगर, चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करीत आहे.

Protected Content