पाळासखेडे येथे गायीची चोरी; पोलीसात गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडे येथील एका शेतकऱ्याची ३२ हजार रुपये किमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अजय रामदास भवरे (वय-२७) रा. पळासखेडे ता. भडगाव जि. जळगाव हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे गाई आहेत. त्यांच्या खळवाडीतील गोठ्यातून अज्ञात व्यक्तीने शुक्रवार १६ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३२ हजार रुपये किमतीची गावरान जातीची गाय चोरून नेले. याप्रकरणी अजय भवरे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज माळी करीत आहे.

 

 

Protected Content