बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वराड गावातील गुरांच्या गोठ्याचे प्रकरणासह विविध प्रकरणे अद्याप प्रलंबित आहे. यावर तात्काळ मार्ग काढण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
आज बोदवड तालुक्यातील वराड गावातील गुरांच्या गोठ्याचे प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत गेल्या वर्ष भरापासून शेतकऱ्यांनी अर्ज करून ही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. तसेच वराड गावातील ग्रामसभा अद्यापही प्रलंबित आहे त्यामुळे नवीन पुरवणी कृती आराखडा अजूनही तयार झालेला नाही आहे. तसेच गोर गरीब शेतकरी शासनाच्या हलगर्जीपणामुळे योजनेपासून वंचित राहत आहे. यावर लवकरच मार्ग काढा आधी संभाजी ब्रिगेड यांनी दिलेल्या निवेदनावर द्वारे मागणी केली आहे
तसेच निवेदन देण्याकरिता गेले असता बोदवड येथील गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी हे पण उपस्थित नव्हते कार्यकर्त्यांनी फोन द्वारे संपर्क केला असता फोन उचलला गेला नाही म्हणून नायब तहसीलदार यांचेकडे निवेदन कार्यकर्त्यांनी सुपूर्द केले. या विषयावर लवकर निर्णय न घेतल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार तथा शहर अध्यक्ष शैलेश पुंडलिक वराडे यांनी दिला आहे.