फुलेंबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी

रावेर प्रतिनिधी । येथील अप्पा हातनुरे या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महान व्यक्तीबाबत आक्षेपार्ह विधान करून यु-ट्यूब चॅनल वर अपलोड केले असून फुलेप्रेमींच्या भावना दुखवल्याने संबंधित व्यक्तीस शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन यांचे हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस (क्रीडा) गौरव महाजन, रा.यु.कॉ. शहरउपाध्यक्ष निखिल महाजन, कौशल शिंदे, शुभम मराठे, पदवीधर शहराध्यक्ष विवेक पाटील, प्रणिल भावसार, श्रीजय महाजन, स्वप्नील महाजन, कॉन्ट्रॅक्टर किरण बारी, वैभव महाजन, विनोद राऊत, निखिल महाजन आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

प्रथमतः या आक्षेपार्ह विधानाबद्दल तीव्र स्वरूपाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. वरील विषयी निवेदन देण्यात येते की, लोकसेवा अकॅडमी पुणे, येथील अप्पा हातनुरे या विकृत प्रवूत्तीच्या इसमाने मोबाईल क्रमांक ९०१११९४४४३ यावरून दि. २४ मार्च २०२१ रोजी या इसमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी काही एक कारण नसतांना आक्षेपार्ह विधान करून देशातील व महाराष्ट्रातील तमाम शिव-फुले-शाहू-आंबेडकर या बहुजन समाजाच्या लोकांच्या तीव्र स्वरूपात भावना दुखावल्या आहेत.

यामुळे समस्त फुलेप्रेमी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत आहे व संबंधित इसमाला कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहे. वास्तविकपहाता विद्येच्या माहेर घर असलेल्या पुणे येथे लोकसेवा अकॅडमीच्या वतीने एम.पी.एस.सी. परीक्षेचे क्लास घेणाऱ्या या बुद्धीहीन व्यक्तीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे कर्तृत्व व इतिहास अजिबात माहिती नाही, ही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करत आहे. त्याला कायमस्वरूपी पायबंद करावे. तरी या निवेदनाचा विचार करून सदर निवेदनाची प्रत शासनाकडे रवाना करून संबंधित सडक्या बुद्धीच्या दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर शासन करावे व FIR दाखल करावे. ही समस्त फुलेंप्रेमीच्या वतीने तहसीलदारांना विनंती करण्यात आली.

Protected Content