सावदा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत निवेदन

सावदा प्रतिनिधी । प्रशासनाच्या व व्यापारी आस्थापनाच्या माध्यमातून सावदा शहरातील चौफुली व मुख्‍य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांच्यातर्फे नगरपालिक मुख्य‍ाधिकारी यांना आज देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सावदा शहर ३८ गावांची मुख्य बाजारपेठ आहे. येथे मोठा आठवडे बाजार, गुरांचा बाजार व केळीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात व्यवसायिक व खेरीददार येत असतात, त्यामुळे शहर गजबजलेले असते. त्यामुळे अपप्रवृत्तीचे लोक छोटे-मोठे गुन्हेगार यांच्या सतत वावर असतो. अशा लोकांवर व शहराचा रक्षणासाठी प्रशासनातर्फे काहीतरी वचक हवा म्हणून नगरपालिका व प्रशासनाच्या व व्यवसायिक आस्थापनाच्या माध्यमातून आपण जसे फैजपूरला सीसीटिव्ही कॅमेरे बसवून घेतले. तसे सावदा शहरात ही अशीच व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी निवेदन देतांना, बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी, मियांवाकी प्रकल्पाचे ऋशीकेश पाटील, सर्वेश लोमटे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सागरभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ता नाजिम शेख उपस्थित होते.

 

Protected Content