आव्हाणे येथे एसटी बस सेवा सुरु करण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे येथील नागरिक रोज जळगाव शहराला ये-जा करत असतात. मागील दीड वर्षापासून एसटी बसेस् बंद असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. आज जळगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शाखा व्यवस्थापक यांना बसेस् लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील आव्हाणे येथे पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून गावातील जवळजवळ ५०% टक्के लोकसंख्या ही जळगाव शहराला रोज ये-जा करीत असते. मागील दीड वर्षापासून एसटी बसेस् बंद असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.गावातील बहुसंख्य विद्यार्थी हे शहरात शिकण्यासाठी येत असतात शहरात येण्या-जाण्यासाठी त्यांना दोन वेळा रिक्षा बदलावी लागते. यामध्ये वित्त व वेळ दोघांचा अपव्यय होतो त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस  जळगाव तालुक्यात तर्फे शाखा व्यवस्थापक यांना  बसेस लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बापू  परदेशी , राष्ट्रवादी तालुका  युवक उपाध्यक्ष रवि सर,माजी सरपंच बोरणार पिंटू भाऊ, चेतन कोळी, प्रमोद सोनवणे व अतुल चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Protected Content