डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात व्हीएआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, रायपूर, छत्‍तीसगडच्या वतीदने ऑफलाईन परिसर मुलाखतीचे २२ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यात पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

व्हीएनआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल बिझनेस मॅनेजर प्रदिप पाटील, एरिया बिझनेस मॅनेजर पंकज कुमार तसेच डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयत २०१५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तसेच व्हीएनआरमध्ये टेरीटॉरी मॅनेजर हर्षल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती घेतल्यात. या परिसर मुलाखतीतून पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी अभिनदन केले तसेच ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेल अधिकारी मोनिका नाफडे-भावसार यांनी व्हीएनआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मुलाखत समितीचे आभार मानले.

 

Protected Content