बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरण कक्षात ठेवा : डॉ. पाटोळे

रावेर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील तहसील कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येकाला शाळेतच विलगीकरण कक्ष कक्षात दाखल करण्याच्या सूचना केल्यात.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन डी. महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील उपस्थित होते. तालुक्यात रावेर व सावदा येथील कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या इमारतीत खाटांची व्यवस्था स्थानिक पातळीवरच करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. ग्रामीण भागात शनिवारपासून बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येकाला या शाळेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे. बाहेरील आलेल्या व्यक्तीने विलगीकरण कक्षात राहण्यास विरोध केल्यास अथवा नकार दिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल कारण्यात येणार आहेत.

Protected Content