धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरूण व तरूणींनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांना बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अनेक तरुण-तरुणी हे काम करत आहे. त्यांचा कालावधी आता संपत आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. शासनाने यावर गंभीर्याने विचार करून प्रशिक्षण कालावधी वाढविण्यात यावा, राखलेले मानधन त्वरित देण्यात यावे आणि मानधनात वाढ करावी अशी मागणी करत तरुण-तरुणांनी बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.