जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदीर लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात येवून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार १४ जून रोजी पुण्यातील श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज मंदीराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिळा मंदीराचे लोकार्पण सभारंभ करण्यात आली. या सभेत मार्गदर्शन करण्यापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संभाषण करून दिले नाही याचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तिव्र निषेध व्यक्त करण्यात आले असून केंद्र सरकारने याबाबत दक्षता घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी, युवक कार्याध्यक्ष सुशिल शिंदे, जितेंद्र बागरे, संजय जाधव, अनिल पटेल, चंद्रमणी सोनवणे, विनोद सुर्यवंशी यांच्यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.