अयोध्या प्रकरण : आरएसएसकडून मुस्लिम नेत्यांसह इतर पक्षांसोबत बैठक

baithak

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद जमीन वादावर सुप्रीम कोर्टाचा निकाल काही दिवसांतच येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आपल्या मुस्लिम नेत्यांच्या माध्यमातून दुसऱ्या पक्षासोबत बैठकीच आयोजन केले आहे. या बैठकीत आरएसएस-भाजपशी संबंधित मोठे मुस्लिम नेते आपल्या समाजातील मौलाना आणि विद्वानांशी चर्चा करत आहेत.

जमीयत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना सय्यद अशरद मदनी आणि शिया मौलाना सय्यद कल्बे जव्वाद हे नेतेही या बैठकीत सहभागी झालेत. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या प्रकरणावर ही बैठक सुरू आहे. यात मुस्लिम नेत्यांसह आरएसएसचे अनेक नेते उपस्थित आहेत. भाजपचे नेते शाहनवाज हुसेन आणि चित्रपट निर्माते मुजफ्फर अलीही उपस्थित आहेत. गेल्या आठवड्यात आरएसएसची बैठक झाली होती. या बैठकीत आरएसएसचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल, भाजपचे माजी नियोजन सचिव रामलाल (सध्या संघटनेच्या कार्यक्रमांचे प्रभारी) आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेशकुमार सहभागी झाले होते. पुढच्या आठवड्यात मुस्लिम समाजातील तज्ज्ञ आणि प्रतिष्ठीत संस्थांशी २० अधिक बैठका घेण्यात येणार आहेत. यासाठी या बैठकीत आरएसएसने मुस्लिम नेत्यांची नियुक्ती केली.

Protected Content