शहरातील १६ मार्केटमधील गाळेधारकांचे बेमुदत उपोषणाच्या मागणीसाठी निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेने शहरातील विविध गाळेधारकांकडे अन्यायकारक नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. महापालिकेने थकबाकीच्या मोठ्या रकमेचे बिले दिली जात आहेत. १५ जूनपासून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणासाठी परवानगी द्यावी, असे निवेदन व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

व्यापार्‍यांनी दिलेल्या निवेदनानुसार असे की, जळगाव महापालिकेकडून गाळेधारकांवर होत असलेल्या कारवाई निषेध म्हणून जळगाव शहरातील १६ मार्केटम २६  मार्चपासून बेमुदत बंद होते. तसेच एक वर्षापासून कोरोना व त्यामुळे होणार्‍या लॉकडाऊनमुळे १२० दिवस व्यवसाय बंद होता. असे असतांना महापालिका अन्यायकारण नुकसान भरपाईची मागणी गाळेधारकांकडे करत आहेत. घरदार विकून सुध्दा गाळेधारक एवढी रक्कम भरुन शकणा नाही. तसेच महापालिका गाळेधारकांना म्हणणे मांडण्याची संधीही देत नाही. त्यातच दोन महिन्यांपासून १६ मार्केटमधील गाळेधारकांनी बंद पुकारला. त्यामुळे परिवाराचे पालन पोषण, आजार, मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टींसाठी गाळेधारकांकडे पैसे उरलेले नाही. अशा परिस्थितीत महापालिका मोठया रकमेची बिले देत आहे. व ते न भरल्यास सिल करण्याची कारवाई करत आहेत. महापालिकेच्या कारवाईला कंटाळून गाळेधारकांनी आत्मदहन तसेच साखळी उपोषणाची परवानगी मागितली होती. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनामुळे ते स्थगित करण्याची सुचना दिल्याने गाळेधारकांनी जिल्हाधिकार्‍यांची सुचना मान्य केली होती. महापालिकेकडून सुरु असलेल्या अन्यायकारण कारवाईमुळे कुठल्याही गाळेधारकाच्या परिवारातील कोणत्याही सदस्याचे बरेवाईट झाल्यास , किंवा गाळेधारकाने आत्महत्या केली, त्याचा जीव गेल्यास सर्व महापालिका प्रशासन जबाबदार राहिल असाही इशारा व्यापार्‍यांनी दिलेला आहे. तसेच मनपाच्या कारवाईचा निषेध तसेच गाळेधारकांना योग्य न्याय मिळावा यासाठी गाळेधारक संघटनेतर्फे १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास परवानगी द्यावी, असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन आज गुरुवारी मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, बंडू काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले. यावेळी गाळेधारकांचीही उपस्थिती होती.

Protected Content