अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळविले; तक्रार दाखल

मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील चांगदेव येथील एकाने तरुणीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी तरुणीची आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक सात जून रोजी चे रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादीचे कुटुंब जेवण करून झोपल्या नंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी ला पाणी पिण्यासाठी  जाग आली.तेव्हा तिची तरुण मुलगी ही जागेवर दिसली नाही. तसेच इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतर देखील ती आढळून आली नाही. सदर घटना सात जून चे रात्री दहा ते आठ जून चे सकाळी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान गावात चौकशी केल्यानंतर गावातीलच आकाश उर्फ आर्यन सुधाकर बोदळे हा युवक देखील गायब असल्याने त्यानेच फुस लावून आपल्या मुलीस पळवून लावले असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी महिलेने आरोपी आकाश उर्फ आर्यन सुधाकर बोदडे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास परिवेक्षक पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करत आहे.

Protected Content