शिरपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा; जळगाव संघासाठी खेळाडूंची निवड

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यस्तरीय आंतर जिल्हा १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी सुरू झाली आहे. ही स्पर्धा शिरपूर येथे आयोजित करण्यात आली असून, जळगाव जिल्हा संघासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडत आहे.

जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्राध्यापिका डॉ. अनिता कोल्हे आणि सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. निवड चाचणीची प्रक्रिया १० मे पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ या दरम्यान झालेला आहे, तेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र असतील.

इच्छुक खेळाडूंनी आपले जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड घेऊन सकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे हिमाली बोरोले, गुंजा श्रीवास्तव, छाया पाटील, राहील शेख आणि वसीम शेख यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, आपले नाव सीएसआरमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेने केले आहे. जळगाव जिल्ह्यातील युवा फुटबॉल खेळाडूंना राज्य स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची ही चांगली संधी आहे.

Protected Content