Home Cities जळगाव जळगावात महाराणा प्रताप जयंती उत्साहात; अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन

जळगावात महाराणा प्रताप जयंती उत्साहात; अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन

0
400

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभात चौकात महाराणा प्रताप सिंह यांची ४८५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाराणा प्रताप चौकात सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. जी. एन. पाटील आणि उदय पाटील यांनी संयुक्तपणे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि महाराणा उत्सव समिती यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने समाजबांधव, विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यप्रेमाचे स्मरण केले. त्यांच्या उदात्त विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘महाराणा प्रताप अमर रहे’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.


Protected Content

Play sound