जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पोर्ट हाउस च्या सहकाऱ्याने नाशिक विभागीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन सानेगुरुजी वाचनालयातील हॉलमध्ये करण्यात आले होते. यात मुलींच्या स्पर्धा सतरा वर्ष वयोगटात जळगाव ची सेंट टेरेसा विजयी झाले.
१४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात नाशिक केंब्रिज स्कूल, १७ वर्षे वयोगटात सेंट टेरेसा जळगाव तर १९ वर्षे वयोगटात झेड. बी. पाटील कॉलेज धुळे यांनी सुवर्णपदक पटकावले. पारितोषिक वितरण समारंभ खेळाडूंना व संघांना ट्राफि स्पोर्ट्स हाऊसतर्फे देण्यात आली आहे. प्रमुख अतिथी म्हणून टेबल टेनिस असोचे फारुक शेख, राजु खेडकर ,डॉ. श्रीधर पाटील, विवेक अडवणी, हेमंत कोठारी, नाशिकचे शशांक वझे व जळगावचे शैलेश जाधव, क्रीड़ा अधिकारी रेखा पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रेखा पाटील यांनी केले तर आभार विवेक आळवणी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विवेक आडवणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव त्रिपाठी, वल्लभ त्रिपाठी, शैलेश जाधव, अमित चौधरी, अनिकेत अडवणी, शैलेश जाधव यांचे सहकार्य लाभले. नाशिक विभागातून राज्यपातळीवर जाणारे संघ व खेळाडूंची नावे १४ वर्षातील नाशिक केंब्रिज स्कूल नाशिक खेळाडू मिताली श्रीकृष्ण पुरकर, अनन्या सतीश शेळके, व सुरभी अनिल टिक्कस , १७ वर्षातील गटात सेंट टेरेसा स्कूल जळगाव श्रुती केसकर, दुर्गेश्वरी पाटील, गौरी बाहेती, चिन्मय बाविस्कर व जानवी पाटील , १८ वर्षे वयोगटात झेड. बी. पाटील कॉलेज धुळे खेळाडू आकांक्षा चंद्रकांत भदाणे, प्रेरणा सुनील राजपूत, प्रीती अनिल गिरासे, ऋतुजा अजित वसावे, अंकिता प्रकाश सोनार.