मुंबई वृत्तसंस्था | राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द होऊ शकतं असं म्हटलं आहे. पण ते सांगतांनाच त्यांनी एक निर्वाणीचा इशाराही दिला आहे.
सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल, असंही ते म्हणाले
संपामुळे एसटीचं 550 कोटी रुपयांचं नुकसान झाल्यावरही माणुसकीच्या दृष्टीनं विचार करुन सोमवारपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर हजर राहतील त्यांचं निलंबन रद्द करण्यात येईल. त्यानंतर मात्र ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठीची ही शेवटची संधी आहे.. असं परब यांनी सांगितलं.