दहावी व बारावीच्या परीक्षा होणार मे महिन्यात

मुंबई : प्रतिनिधी-। दिवाळीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यासोबत दहावी आणि बारावीचे मुख्य परीक्षा पुढील वर्षी मे महिन्यात होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

अनलॉक मध्ये आता बहुतांश बाबी सुरू झाल्या असल्या तरी शालेय शिक्षण सुरू होण्या बाबत अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या म्हणाल्या की दिवाळीनंतर 23 नोव्हेंबर पासून योग्य ती काळजी घेऊन नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी झालेली आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
अकरावीच्या प्रवेश याबाबत लवकरच शासन निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यावेळी कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष लांबलेले असल्यामुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या मुख्यपरीक्षा यापुढे वर्षी मे महिन्यात घेण्यात येतील अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे.

Protected Content