आमदार राम कदम यांचे मंत्रालयासमोर उपोषण

 

 

 

मुंबई : प्रतिनिधी । पत्रकार अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आमदार राम कदम यांनी आज मंत्रालयासमोर उपोषण सुरु केले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

: भारतीय जनता पक्षाचे नेते अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी आक्रमक झालेले आहेत. आमदार राम कदम यांनी आधीच या प्रकरणी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर केले होते. मात्र सरकारने या मागणीला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी आज सकाळी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केले. त्यांनी अर्णब गोस्वामी यांना न्याय मिळावा असे फलक घेऊन उपोषण सुरू केले

अर्नब गोस्वामी यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असून त्यांची त्वरित सुटका करावी आणि त्यांच्या अटकेसाठी जबाबदार असणाऱ्यांना पोलिसांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. दरम्यान उपोषण सुरू असतानाच आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.

Protected Content