रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या गावी गेले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपाचारासाठी रुग्णालयात गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे.

 

 

संबंधित पोलिस कर्मचारी रामदास आठवले यांच्या बंगल्यावर कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना संक्रमण चाचणी करण्यात आली. यानंतर वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या पोलिस कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित कर्मचारीवर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, राज्यात 23 मार्चपासून ते आतापर्यंत एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 11 पोलीस अधिकारी आहेत. तर 53 पोलीस शिपाई आहेत. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात तब्बल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content