Home Cities अमळनेर स्वामीनारायण मंदिरात ७१ दात्यांचे रक्तदान – लायन्स क्लब व मंदिराचा संयुत उपक्रम

स्वामीनारायण मंदिरात ७१ दात्यांचे रक्तदान – लायन्स क्लब व मंदिराचा संयुत उपक्रम

0
107

अमळनेर प्रतिनिधी | प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या १०० व्या जयंती निमित्त येथील लायन्स क्लब व स्वामीनारायण मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले.

मंदिरात प्रमुख स्वामीजी महाराज यांचा १०० वा जयंती महोत्सव लायन्स क्लब व BAPS मंदिरातर्फे साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिराला संतश्री योगीस्नेह स्वामीजी व अखंदमुनी स्वामीजी यांचे सहकार्य लाभले. यावेळी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट विनोद अग्रवाल, ट्रेझरर प्रसन्ना जैन, प्रशांत सिंघवी, राजू नांढा, डॉ.बी.आर.बाविस्कर, महेश पवार, चेतन जैन, अमरीश अग्रवाल, चंदू वाणी, अतुल सोनी, अजय हिंदुजा तसेच भक्त परिवार आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound