एस.एस.बी.टी. महाविद्यालयात एनर्जी क्लबचे उदघाटन उत्साहात

ssbt clg

जळगाव प्रतिनिधी । एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी येथे आज (दि.5) एनर्जी क्लबचे उदघाटन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाच्या सुरुवात क्लबचे अध्यक्ष तथा केमिकल व बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.व्ही.आर.डिवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात डॉ.व्ही.आर.डिवरे यांनी एनर्जी क्लबचे उद्देश व भविष्यातील कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. संजीव फडणीस यांनी आपल्या भाषणामध्ये नवीनीकरणक्षम ऊर्जा या विषयावर प्रामुख्याने प्रकाश टाकला. त्यांनी विविध सौर उपकरणे व त्यांच्या उपयोगितेची सविस्तर माहिती उपस्थितांना करून देतानाच ऊर्जा संवर्धनाचा संदेश सुद्धा दिला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.पी. शेखावत यांनी महाविद्यालयात ऊर्जा संवर्धन, अपारंपारीक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर आणि विद्यार्थी तसेच प्राध्यापकांकडून सुरु असलेल्या विविध अपारंपारीक ऊर्जा क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांची माहिती दिली. यानंतर डॉ.एस.ए.ठाकूर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर यांनी ऊर्जा संवर्धनाची सर्व उपस्थितांना शपथ दिली.

संजीव फडणीस, सिनियर मॅनेजर, सौर ऊर्जा विभाग, जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड हे विशेष अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.एस.पी. शेखावत यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरव दिलीप खोडपे यांनी केले. डॉ. एन.वाय. घारे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. व्ही. पी. सांगोरे व प्रा. जयंत प्रा.पारपल्लीवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रम घेतले.

Protected Content