“श्री गणेशा शिक्षणाचा” अभियान आदिवासी ९ बालकांसाठी ठरले शिक्षणाचा ज्ञानदिप

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे अभियानाला सुरूवात; प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांची संकल्पना

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश उत्सवाचे औचित्य साधुन गणपती बाप्पाची आराधना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे “श्री गणेशा शिक्षणाचा” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी शालेय शिक्षण सोडलेल्या किंवा शाळेत प्रवेश न घेतलेल्या शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करून शाळेत प्रवेश मिळवून देत आहेत.

या अभियाना अंतर्गत नंदुरबार जिल्हयातील शहादा तालुक्यातील आदिवासी समुदायातील शिक्षणापासून वंचित नऊ शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेश मिळून त्यांच्या जिवनात अज्ञानाचा अंधकार दूर होऊन शिक्षणाचा ज्ञानदीप पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नंदुरबार जिल्हाध्यक्षा मंजुळाताई पाडवी यांनी शहादा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या नऊ मुलांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगत त्यांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत दाखल करण्यास प्रवृत्त केले.

यामध्ये मडकानी ता.शहादा  या गावातील कु.प्रमिला दिलीप भिलावे,  विक्की शंकर ठाकरे, सुरज प्रल्हाद भिलावे.  रामपुर ता.शहादा या गावातील कु.मिना सोमसिंग ठाकरे, कु.हिना सोमसिंग ठाकरे. कु.हिना अजय वाघ. फत्तेपूर ता.शहादा या गावातील नितेश रतिलाल ठाकरे, सोहम विजय वळवी,  रघुनाथ दिलीप पवार या एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले. तसेच मंजुळा गावित यांनी स्वखर्चाने या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शिक्षकांच्या हस्ते वाटप केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा चिटणीस मनिषा बेडसे, युवती जिल्हाध्यक्ष तिथलं पावरा आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Protected Content