शालेय शासकीय क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी यावल तालुका क्रीडा शिक्षकांची सभा शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर  रोजी गटसाधन केंद्र यावल येथे संपन्न झाली.

 

क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा ही गटशिक्षणाधिकारी  नैमुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक के. यु. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर स्पर्धा समितीचे सदस्य  जितेंद्र फिरके,  दिलीप संगेले, रमेश जावळे ,के. आर. सोनवणे, प्रवीण महाजन, सय्यद अश्फाक अली, एम. आर. महाजन , बी. डी. पाटील, मुख्याध्यापक पी. बी. पाटील, योगेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.  या सविचार सभेत तालुक्यातील दहा खेळांचे दि १६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा डॉ. झाकिर हुसेन उर्दू हायस्कुल यावल, श्री दत्त हायस्कुल चिखली, तालुका यावल , विकास विद्यालय सातोद,  ज्योती विद्यामंदिर सांगवी, डाॅ.डी के सी विद्यालय डांभुर्णी,आदर्श विद्यालय दहिगांव,न्यु इंग्लिश स्कूल भालोद,इंग्लिश मेडियम निवासी माध्यमिक स्कूल दोनगांव, एम. के. पाटील, लोक विद्यालय पाडळसे , भारत विद्यालय न्हावी या ठिकाणी १४ , १७ , व१९ या वयोगटातील मुले आणि मुलीच्या स्पर्धाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.  तालुका सर्व जिल्हास्तर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी  मुख्याध्यापक के. यू. पाटील यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या.

मुख्याध्यापक पंजाबराव पाटील, क्रीडा शिक्षक जितेंद्र फिरके, क्रीडा शिक्षिका जोशी, रत्नप्रभा पाटील, हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त साजिद  इष्ने शेख मेहबूब , तसेच  के. आर. सोनवणे, आर. एस. जावळे यांची पर्यवेक्षकपदी निवड व प्रवीण महाजन यांची आमोदा येथील शिक्षण संस्थेत बहुमताने निवडून आल्याबद्दल व व्ही. पी. वाघ यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यासंदर्भात या सभेत यावल तालुक्यातील विविध खेळातील क्रीडा शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र फिरके तर आभार के. आर. सोनवणे यांनी मानले.

 

Protected Content