साकरे विधालयात सुमनांगण क्रिडा महोत्सव उत्साहात

6a83c3e4 bfb5 4612 83b9 2cc4e0d7a821

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटीया माध्यमिक विधालयात सुमनांगण क्रिडा महोत्सव मोठया उत्साहात नुकताच पार पडला.

फिड इंडीया मुव्हीमेट अंतर्गत दि. १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध शालेय व पारंपारिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १२ डिसेंबर रोजी उद्घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष दिलीप रामु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालकांच्या उपस्थित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा शिक्षक किशोर पाटील यांनी केले. मूख्यध्यापिका अनिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात दिलीप पाटील यांनी सर्व खेळाडूनां शुभेच्छा देवून सर्वागींन प्रगतीसाठी खेळाचे महत्व सांगितले. या क्रिडामोहत्सवात विविध पारंपारिक खेळांना विशेष महत्व दिले गेले. विद्यालयातील ३२८ मुला मुलींनी या महोसत्वात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचन क्रिडा शिझक डी.जी. साळुंखे यांनी केले. तर आभार पटाईत सर यांनी मानले.

Protected Content