बियाणी पब्लिक स्कुल व ज्युनियर कॉलेज मध्ये क्रिडा स्पर्धा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  भुसावळ येथील बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच बियाणी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत नमो चषकच्या अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धां उत्साहात पार पडल्या.

प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.चारुलता तुषार पाटील होत्या तर बियाणी एज्युकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी, बियाणी एज्यूकेशन गृपच्या सचिव डॉ. संगीता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, राजेश पारिख, प्रवीण भराडिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे डॉ. चारुलता पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्व पटवून मोलाचे मार्गदर्शन केले. विजेत्या स्पर्धकांचे सर्वांनी कौतुक केले. शाळेतील साडे चारशे विद्यार्थी-विद्यार्थिनीं स्पर्धेत भाग घेतला होता. मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया यांनी आभार मानले.

Protected Content