डी.वाय.एस.पी. कृष्णांत पिंगळे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डी.वाय.एस.पी. यांनी केले विद्यार्थांना मार्गदर्शन भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भुसावळ तालुक्याचे डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी ९ जानेवारी रोजी मार्गदर्शन केले.

कृष्णांत पिंगळे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी इयत्ता दहावी नंतर करियर संदर्भात जे जे मार्ग व वाटा असतात विद्यार्थ्यांना सांगून त्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले. शिस्तबद्ध जीवन पद्धतीने, अभ्यास पद्धतीने सदर निवडलेल्या करियर वाटेत आपण कसे यशस्वी होऊ शकतो हे सांगितले. यावेळी प्रिंसीपल नीना कटलर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content