राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडत असतांनाच ते आपल्या सहकार्‍यांसह शपथविधी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

अजित पवार हे आपल्या सहकार्‍यांसह राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांसह राष्ट्रवादीचे एकूण नऊ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात घडामोडी गतीमान झाल्यानंतर आता राष्ट्रवादीची फुट पडणार असल्याची जवळपास स्पष्ट झालेले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडून राज्यात सत्तांतर घेतले. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील फुट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे राजभवनाकडे निघाले असून त्यांच्यासह नऊ नेते शपथविधी घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे आदींचा समावेश असेल अशी माहिती समोर आली आहे. आजच मंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content