भुसावळ, प्रतिनिधी | धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृतरीत्या खाद्य पदार्थ विकणार्या विक्रेत्यांविरुद्ध २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत एकूण ८५ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही मोहीम भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले आहे. खान-पान निरीक्षक,मुख्य वाणिज्य निरीक्षक,मुख्य तिकिट निरीक्षक,तिकीट तपासणीस तसेच रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली. तसेच यानंतरही रेल्वे सुरक्षा बलाकडून अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.