सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी ; पो.नि.दिलीप गढरी

WhatsApp Image 2019 08 07 at 8.08.05 PM

भुसावळ, प्रतिनिधी | संगणक ,स्मार्ट फोन यासारख्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्‍वे पोलीस ठाण्याचे पो.नि. दिलीप गढरी यांनी केले. ते महाराष्ट्र सायबर यांच्यावतीने जनजागृतीपर पत्रके वाटून प्रवाशांमध्ये जागृती करण्याचे काम केले जात असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई- मेलवर क्लिक करु नका, ई मेल पासवर्ड ऍटो सेव्ह करणे टाळा. ब्राऊजर अद्ययावत करा, संगणकावरील इस्टॉल प्रोग्रॉमकडे वेळोवेळी लक्ष ठेवा. ऍन्टी व्हायरसचा उपयोग करा, संगणकासाठी वैयक्तीक फायबर वॉल अद्ययावत करुन घ्यावा. मोबाईल स्मार्टफोनला पासवर्ड ठेवा. बँकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका. अनोळखी व्‍यक्तीच्या लिंक्स उघडू नका. एचटीपीएसने सुरुवात होणार्‍या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करा. बँकेविषयीची कोणतीच माहिती कोणालाही दुरध्वनी व मोबाईलवर देऊ नका. एटीएम कार्डचा वापर करतांना एटीएम सेंटरची पाहणी करुन संशयास्पद आढळल्यास पुढील व्यवहार करणे टाळा. सायबर गुन्हा घडला असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहनही पोनि. गढरी यांनी यावेळी केले. या प्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोनि गढरी व रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांनी रेल्वे स्थानकातील मुसाफिर खान्यात सायबर गुन्हे रोखण्याबाबत प्रवाशांना जनजजागृती पत्रके वाटून प्रचार व प्रसार केला.

Protected Content