प्रजासत्ताकदिनी भुसावळ येथे विस्थापितांचा आंदोलनाचा इशारा

andolan

भुसावळ, प्रतिनिधी | हायवे चौपदरी करणात दीनदयाल नगर मधील विस्थापित झालेले आणि महानिर्मितीच्या राखेमुळे विस्थापित झालेले गावातील शेतकरी मजूर यांनी वारंवार मोर्चा विनंती, धरणे आंदोलन, रास्ता रोको आदी करून देखील प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेता येथील रहिवाशांना बेघर करत असल्याने येथील रहिवासी भुसावळ येथे २६ जानेवारीला शासकीय ध्वजारोहण प्रसंगी शर्ट न घालता म्हणजेच उघडे राहणार आहेत.

महानिर्मितीच्या राखेमुळे नदी, तलाव शेती प्रदूषित होऊन येथील नागरिकांचा रोजगार बंद केला जात आहे. हायवे व महानिर्मितीच्या प्रकल्पांच्या जनसुनावणीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसून दोन्ही प्रकल्पांमध्ये स्थानिक विस्थापितांना कोणताही रोजगार मिळत नाही. परिसरातील महानिर्मितीच्या राखेमुळे शेती व शेतीपूरक उद्योग मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे संपून ग्रामस्थ शेतकरी बेरोजगार होत आहेत. दीनदयाल नगर मधील नागरिकांना बेघर करून महानिर्मितीच्या राखेमुळे विल्हाळे परिसरातील जंगल नवीन तलाव प्रदूषित करून युवक, ग्रामस्थ शेतकरी यांना उघड्यावर टाकण्यात आले आहे. म्हणून दीनदयाल नगर मधील बेघर झालेले पुरुष महानिर्मितीच्या राखेमुळे विस्थापित झालेले युवक आणि लोकसंघर्ष मोर्चाचे यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर मधील आदिवासी, दलित, भुसावळ येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास शर्ट न घालता म्हणजेच उघडे मागण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत.

Protected Content