नागरीकांच्या सहकार्याशिवाय स्थानिक प्रशासन चालविणे अवघड – सरपंच विलास अडकमोल

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नागरीकांच्या सहकार्याशिवाय स्थानिक प्रशासन चालविणे अवघड असुन नागरीकांनी नियमाने नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरणे हे त्यांचे कर्तव्याने भरल्याशिवाय गावाचा विकास होणे अशक्य आहे. याची काळजी समस्त नागरीकांनी घेणे अत्यंत गरजे आहे असे आवाहन कोरपावली येथे नागरीकांनीच पाठ फिरवल्यामुळे आयोजीत ग्रामपंचायतच्या स्थगित झाल्याने ग्रामसभेच्या पार्श्वभुमीवर सरपंच विलास अडकमोल यांनी व्यक्त केले आपल्या मनोगतातुन व्यक्त भावना केल्या.

कोरपावली तालुका यावल येथे काल दिनांक ३० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरीकांच्या अडीअडचणी समस्या जाणुन घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र एक तास ग्रामपंचायतच्या कार्यालया समोर सरपंच आणी उपसरपंच व सदस्य ग्रामस्थांची वाट बघत होते अखेरीस एक ही ग्रामस्थ ग्रामसभेसाठी पुढे न आल्याने ही अखेर सरपंच विलास अडकमोल यांनी ग्रामसेवकडी एस तिडके यांच्याशी चर्चा करून ग्रामसभा ही पुढील काही काळासाठी स्थगित केली. या निमित्ताने सरपंच विलास अडकमोल यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी औपचारिकरित्या चर्चा करतांना ग्रामपंचायत अंतर्गत कारभाराविषयी विविध विषयांवर माहिती दिली.

ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांच्या उदासिनतेमुळे व ग्राम पंचायतच्या दुर्लक्षीत कारभारामुळे विविध कराच्या रूपात मिळणारी ४५ लाख रुपये करवसुलीची ही थकबाकी असल्याची माहीती ही त्यांनी यावेळी दिली अशा प्रकारे ग्रामस्थांनी दुर्लक्ष केल्यास आपल्या गावाचे विकास कामे कशी होणार अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली व कोरपावली ग्रामस्थांनी वेळेवर आपल्याकडील कराची भरावी असे आवाहन केले.

या ग्रामसभेला सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमिदा पिरण पटेल, कविता कोंळबे, सत्तार तडवी, अफरोज पटेल, ग्रामसेवक डी एस तिडके, आदीवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी, गावाच्या समस्या व संकटकाळात धावुन जाणारे युवा समाजसेवक मुक्तार पटेल यांच्यासह आदी काही मोजके सुज्ञ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Protected Content