….त्यामुळे यूरीया साठेबाजीचा प्रश्नच येत नाही : विनोद तराळ

रावेर (प्रतिनिधी) कंपनीकडून यूरीया उपलब्ध होताच मागणी असलेल्या तालुकास्तरावरील कृषी दुकानदारांना आमच्याकडून तात्काळ यूरीया उपलब्ध करण्यात येतो. यामुळे यूरीयाची साठेबाजी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे यूरीया पुरवठा करणारे जळगाव जिल्हाचे होलसेलर विनोद तराळ यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले.

 

तराळ यांनी पुढे सांगितले की, यूरीया उत्पादन करणाऱ्या कंपनी कडूनच यूरीया कमी प्रमाणात येत आहे.आल्यावर गाव किंवा तालुकास्तरा वरील यूरीया रासायनिक खतांची मागणी असलेले कृषी दुकानदारांची नावे व त्यांची मागणी आम्ही थेट कंपनीकडे पाठवतो कंपनी त्यांच्या मागणी नुसार यूरीया आम्हाला पाठवते आम्ही कंपनी कडून आलेला यूरीया मागणी असलेल्या गाव किंवा शहरातील कृषी दुकानदारांकडे पाठवतो.त्यामुळे आमच्याकडे यूरीया शिल्लक राहण्याचा प्रश्नच येत नसल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

 

…हा शेतक-यांमध्ये असलेला गैरसमज

 

खिरवळ येथील तराळ अँग्रो एजन्सी वरुन ठराविक शेतक-यांनाच यूरीयाचा पुरवठा केला जात असल्याच्या चर्चेला उत्तर देतांना विनोद तराळ म्हणाले की, आमच्या खिरवळ येथील कृषी केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येक शेतक-यांना आम्ही यूरीया दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसात आम्ही रावेर नजिक भोकरी जवळ देखील नविन दुकान उघडतोय. रावेरात ज्यांना यूरीया मिळत नसेल त्यांनी तेथून घेऊन जाण्याचे अवाहनही श्री. तराळ यांनी केले आहे.

Protected Content